तुळजापूर,दि.२२ :
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने तातडीने जास्तीत जास्त  लसीकरण होणे गरजेचे आहे, त्या मुळे लसीकरण जनजागृती करण्याच्या उद्देशाने   रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्या संकल्पेनेतून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे सेल्फी पॉईंट  सुरुवात करण्यात आले आहे. 

"मी कोविड 19 लसीकरण करुन घेतले आहे व ही लस सुरक्षित आहे" असे वाक्य लिहिलेले हे  बॅनर आहे. येथे उभे राहून फोटो काढून तो संदेश सोशल मीडिया मधून  सर्वाना मिळावा असा प्रयत्न आहे.

यावेळी विशाल रोचकरी, औदुंबर कदम, किशोर साठे, राजाभाऊ देशमाने, डॉ श्रीधर जाधव, संजय देवकाते यांच्या उपस्थितीमधे उदघाटन झाले, यावेळी सर्वांचे  आनंद कंदले यांनी आभार मानले.
 
Top