तुळजापूर,दि.२२ :
भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड आनिल काळे यांच्यावर कोरोनामुळे गेल्या आठवड्याभरापुर्वी पासुन उपचार सुरु असुन सध्या त्याना आतीदक्षता विभागात हलविले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुञानी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे यांनी दि. १० एप्रिल रोजी ॲन्टेजिन कोविड टेस्ट केली ,त्यामध्ये निगेटिव्ह आले होते. परंतु दोन दिवसानंतर थोडासा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी लगेच एच.आर.टी.सी. टेस्ट करून घेतल्याने रिपोर्टमध्ये फुफ्फुसावर इन्फेक्शन झाल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांचे कुटुंब घाबरून गेले होते. डॉ. सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते.
अचानकपणे दि. 19 एप्रिल रोजी जास्त त्रास जाणवल्यामुळे उस्मानाबादमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नव्हता. परंतु निरामय हॉस्पिटल उस्मानाबाद मध्ये एक बेड उपलब्ध झाला. परंतु ऑक्सिजन लेव्हल कमी होत होती. हा सर्व घटनाक्रम अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळविल्याने सोलापूर येथील हॉस्पिटलला उपचारासाठी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
तातडीने सोलापूर येथील ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड असणाऱ्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये कोठेही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हता. शेवटी मार्केडेय हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
काळे यांची प्रकृती ढासळत असताना चांगले उपचार व्हावेत यासाठी सोलापूर हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार विजय देशमुख आदीनी प्रयत्न केले.
मार्केडेय हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात मागील दोन दिवसांपासून ॲड आनिल काळे यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे मार्केडेंय हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. गुंडीले यांनी नातेवाईकांना सांगितले.
सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते ॲड. अनिल काळे हे सामाजिक कामात पुन्हा एकदा लवकरच सक्रीय व्हावे हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना कार्यकर्त्यांमधुन होत आहे.