तुळजापुर,दि.१ :
येथील श्री तुळजाभवानी मंदीरातील चौघाडा वादक सेवेकरी श्रीरंग पांडुरंग कावरे वय ७१ वर्ष यांचे जिजामाता नगर येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने गुरुवार दि. 1 एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , भाऊ व बहीण असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर रात्री आठ वाजता अपसिंगा रोडवरील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले.