तुळजापूर,दि.२५:  माझं कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाला साथ देत "माझं गाव माझीच जबाबदारी" असाही उपक्रम राबवूयात आणि आपला गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सर्वोतोपरी काम करू,विनाकारण बाहेर फिरू नका, मास्कचा वापर करावा,प्रत्येक गावकऱ्यांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आरळी (बु) ता.तुळजापूर येथिल ग्रामपंचायतचे  सरपंच गोविंद पारवे यांनी केले आहे.


तुळजापुर तालुक्यातील आरळी बु येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक ठिकाणी व गल्लोगल्ली जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे, यावेळी सरपंच गोविंद पारवे,उपसरपंच किरण व्हरकट, ग्रा.प.सदस्य संजय पाटील, माजी उपसरपंच व्यंकट पाटील, शेखर उकरंडे,जालिंदर माने,कमलाकर उकरंडे, माणिक व्हरकट आदी उपस्थित होते.


गावातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी,सर्दी,ताप,खोकला आदी लक्षणे आढळले की तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्यावेत,आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा, ग्रामपंचायतच्या माध्यमातून परिसर स्वच्छता केली जाणार आहे असल्याचे मत सरपंच गोविंद पारवे यांनी व्यक्त केले. आरळी बु येथील  रुग्णालयात 45 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू असून प्रत्येकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच किरण व्हरकट यांनी केले आहे.
 
Top