तुळजापूर,दि.१४:
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.
डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.सतिश वडगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी ग्रंथपाल दिपक निकाळजे, प्रा.आशपाक आतार, प्रा.सतिश घाडगे ,प्रा.धनंजय लोंढे प्रा.डॉ.नेताजी काळे,प्रा.गोकुळ बाविस्कर, प्रा.बाळासाहेब कुकडे, प्रा.विवेकानंद चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेण्यात आली,सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.