उस्मानाबाद,दि.१४ : 
कोणताही आजार अंगावर न काढता, कर्मचाऱ्यांनी आरोग्य प्रति जागरूक राहावे आणि आपल्या परिवारातील 45 वर्ष वयाच्या पुढील व्यक्तींचे प्राधान्याने कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी केले. 

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यानंतर त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

     
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 वी जयंती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण  केला. 
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन भोसले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांचाळ, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ए.वी.सावंत, उस्मानाबाद पंचायत समितीच्या सभापती हेमलता चांदणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


डॉ आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आपले विचार मांडले.
     कोरोना  संसर्गजन्य साथ रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झपाट्याने वाढला आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने किसान योजना केल्या जात आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात कोरोना लसीकरण वेगाने केले जात आहे. 

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्य प्रती सजग रहावे, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता  कांबळे यांनी केले. 

 
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.फड म्हणाले की, कुरणा चा आजार झपाट्याने वाढत आहे, त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याची संख्या देखील वाढलेली आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः कोरोना  प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे आणि आपल्या कुटुंबियातील 45 वर्षाच्या पुढील सर्व  नातेवाईकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी लक्ष द्यावे. हा आजार होऊ नये यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीचे सर्वांनी पालन करावे. कोणताही त्रास जाणवल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ.फड यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले.

    
जयंती कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पिंथळे, आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी गीरी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक तट, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासनाधिकारी डी.एन. देशपांडे, पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी शिनगारे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर.एन.शिंदे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.
 
Top