तुळजापूर, दि. २१
तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथे आयोजित रक्तदान शिबीरात ६८ दात्यानीं रक्तदान केले.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांचे जयंती निमित्त दि.२१ एप्रिल रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबीराचे उद्घाटन सरपंच ज्योती ठोंबरे,उपसरपंच वैशाली महाडीक यांचे हस्ते झाले.
यावेळी स्त्री आणि पुरुष असे ६८ दात्यानीं रक्तदान केले. त्यासाठी शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील डाँ.आश्विनी गोरे,
डाँ.खाडप यानीं सहकार्य केले.
सदरील शिबीर सिध्दार्थ तरुण मंडळ, सिध्दार्थ शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था, छत्रपती ग्रुप,जय भवानी तरुण मंडळ, जय हनुमान तरुण मंडळ, आण्णाभाऊ साठे विचार मंच,त्रिशूल तरुण मंडळ ,राजे ग्रुप, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सदरील रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व संस्था,मंडळ,
प्रतिष्ठानचे सदस्यानीं परीश्रम घेतले.