येरमाळा, दि. २६ 
देशी दारू  दुकानाचे कुलुप आज्ञात व्यक्तीने मध्यरात्री तोडून सुमारे 2 लाख 12 हजार रूपये किमतीच्या 4 हजार 80 दारूच्या बाटल्या व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना  दहिफळ ता. कळंब येथे रविवार दि. 25 एप्रिल रोजी मध्यरात्री घडली.  

  
 आबासाहेब गजेंद्र रुमणे, रा. येरमाळा, ता. कळंब यांच्या दहिफळा गावातील देशी दारु दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने 25 एप्रील रोजी मध्यरात्री तोडून दुकानातील देशी दारुचे 85 बॉक्स , त्यातील एकुण 4 हजार 80 बाटल्या व दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकुण 2 लाख 12 हजाराचा मुद्देमाल  चोरुन नेल्याची तक्रार  आबासाहेब रुमणे यांनी  येरमळा पोलिसात दिलेल्यावरून चोरट्याविरूध्द भा.दं.सं. कलम- 380, 461 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस करित आहेत.
 
Top