तुळजापूर, दि.३० : कुमार नाईकवाडी
संसर्गजन्य कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तुळजापूर येथिल चार दुकानावर नगरपरिषद व पोलिस यांच्या वतीने दि.30 शुक्रवार रोजी केली धडक कारवाई करुन चार दुकाने सिल केले आहे.
दुकाने सकाळी ११ वाजता बंद करण्याचे आदेश असतानाही कांही दुकाने चालु असल्याची माहिती मिळताच न.प.प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी शहरातील दुकानावर धाड टाकुन केली धडक कारवाई .तसेच विदाऊट मास्क, शारिरीक अंतर याचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर केली दंडात्मक कारवाई.
नगर परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे येथील नळदुर्ग रोडवरील चार दुकान सील करण्यात आले आहेत .त्यामध्ये स्वराली टायर्स, पूजा ऍग्रो, डॅनिश द केक शॉपी व एक पम्चंर दुकान असे चार दुकानांची नावे आहेत .प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे सदर या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी तुळजापुर नगरपरिषदचे मुख्य अधिकारी आशिष लोकरे, तुळजापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण यांनी ही कारवाई केल्यामुळे तुळजापुर शहरातील दुकानादाराचे धाबे दणाणले आहे. तसेच दुकानादार यानी यापुढे नियमाचे उल्लंघन केल्यास नगरपरिषदे च्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. प्रशासनाकडुन दिलेल्या सुचनाचे नागरिक पालन करीत नसल्यामुळे अशा नागरिकांवर चांगलीच दंडात्मक कारवाई करण्यात येईल . त्याचबरोबर
विदाऊट मास्क ,सोशल डिस्टंसिंग न पाळणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
या कारवाई दरम्यान नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी आशिष लोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, नगरपरिषद कर्मचारी वैभव अंधारे , सज्जन गायकवाड, विश्वास मोटे, राजाभाऊ सातपुते,संतोष इंगळे, खलिद सिद्दिकी,अण्णा पारधी, पोलीस हवलदार सावरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पतंगे, अजित सोनवणे, गोवर्धन माने, आदीनी कारवाईवेळी उपस्थित होते..