उस्मानाबाद,दि.०१ : इकबाल मुल्ला
 भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उस्मानाबाद शहरात प्लाज्मा दान नोंदणी व रक्तदान अभियान शिबिर घेण्यात आले. 


राज्यातील कोरोना संकट काळात प्लाज्मा व रक्तपुरवठा याचा होणारा तुटवडा लक्षात घेऊन भाजयु मोर्चाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील, युवा मोर्चा प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर,  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय भाजयुमो युवा अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांच्या सूचनेनुसार  भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी हे अभियान  सुरू आहे. 

दि. 1 मेपासून वय वर्षे 18 ते 44 पर्यंत  कोविड 19 लसीकरणची सुरुवात होत आहे. यामध्ये ही लस घेण्याच्या अगोदर रक्तदान केले तर येणाऱ्या पुढील काळामध्ये तुटवडा भासणार नाही, ही लस घेतल्यानंतर पुढील काही महिने कोणालाच रक्तदान करता येणार नाही. यामुळे भविष्यातील तरतूद आत्ताच करून मोठ्या संख्येनी रक्तदान व प्लाझ्मा दान सर्वांनी करण्याचे आवाहन उस्मानाबाद भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी केले आहे. 


 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून जवळपास दहा जणांनी प्लाज्मा दान करण्यासाठी नोंदणी केली आहे. येणाऱ्या काळामध्ये गरजेनुसार ते प्लाज्मा देतील. 


या शिबिरात  सह्याद्री ब्लड बँक यानी रक्त  संकलन केले. यावेळी राजसिंह राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक व्यंकटेश कोरे, सुजित साळुंखे, सुरज शेरकर, विशाल पाटील, ॲड.कुलदीपसिंह भोसले, नितीन भन्साळी, प्रसाद मुंडे, अभिजित मोरे, सूर्यवंशी, शफिक पठाण, सह्याद्री ब्लड बँकचे डॉ. करंजकर, चौरे, उपस्थित होते.
 
Top