तुळजापूर,दि.१४
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे व प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने साजरी करण्यात आली.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.डॉ. धनंजय खुमणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.विवेक गंगणे, प्रा. दिपक पौळ ,प्रा.सचिन सगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा.समीर माने , प्रा. विजय म्हाळगी , कर्मचारी गोविंद खुरूद , सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.शामकांत डोईजोडे , उपप्राचार्य प्रा.रवी मुदकना व राष्ट्रीय सेवा योजना सदस्यांनी पुढाकार घेतला .