ढोकी,दि.३१ :
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे ढोकी पोलिस ठाणे व पोलिस पाटील संघटना, ग्रामसुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दि. 31 मे रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 153 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या तसेच रक्ताची वाढती मागणी लक्षात घेता व जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


ढोकी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रविकिरण जगताप व हेडकोन्स्टेबल आनंद उंबरे हे दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने कळंब उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पोलिस ठाण्यात सोमवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ढोकी ग्रामस्थ, पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील संघटनेने भरभरुन प्रतिसाद देऊन तब्बल 153 जणांनी रक्तदान केले. बार्शी येथील भगवंत रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन केले. 

यावेळी डॉ. गणेश जगदाळे, किरण कोथमिरे, शबाना पठाण, आकांशा कदम, विजय तोडकरी, ढोकी पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश बनसोडे, पीएसआय रविकिरण जगताप, बुद्धेवार, एएसआय सुहास गवळी, पोलिस हेडकोन्स्टेबल प्रकाश औताडे, अमोल गोडगे, बिबिशन सोनवणे, श्रीमंत क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, उपसरपंच अमोल समुद्रे, पोलिस पाटील राहुल वाकुरे, बिभीषण गवाड, श्रुतिका हाजगुडे, दत्ता हाजगुडे, सुनील अंधारे, फकिरनाथ कांबळे, धनराज सगर आदी उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल  पोलिस उपनिरीक्षक रविकिरण जगताप, पोलिस हवालदार आनंद उंबरे यांचा ढोकी पोलिस ठाण्याकडून सत्कार करून निरोप देण्यात आला.  या रक्तदान शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास पोलिस ठाण्याकडून वाफेची मशीन तर भगवंत रक्तपेढीकडुन टिशर्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
 
Top