लोहारा, दि.१० : 
तालुक्यातील वडगाव वाडी येथील युवकांनी एकत्र येऊन हेल्पनिंग हॅन्डस नावाने ग्रुप स्थापन करुन सामाजिक बांधीलकीतून विविध उपक्रम राबवित असून यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहुन  गावातील प्रत्येक घरात मास्क, सॅनिटायझर, व वाफ घेण्याच्या मशीनचे मोफत वितरण केले आहे.


  लोहारा  तालुक्यातील वाडगाव वाडी  या छोट्याशा गावातील युवक, युवतींनी एकत्र येऊन आपण समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने हेल्पनिंग हॅन्डस या नावाने एक ग्रुप तयार केला.  सन २०१८ पासून प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातून, व्यवसातून प्रत्येकी २०० रुपये जमा करण्यास सुरवात केली. ग्रुप चालू केला तेव्हा ग्रुपमध्ये फक्त १२ सदस्य होते. आज या ग्रुपमध्ये ३१ सदस्य आहेत. 

या ग्रुपच्या माध्यमातून जमा झालेल्या रक्कमेतुन गावातील ज़िल्हा परिषद शाळेसाठी क्रीडा साहित्य, प्रयोग शाळा साहित्य, पांढरे बोर्ड, गॅस कनेकशन, होतकरू विद्यार्थ्यासाठी आर्थिक मदत, शाळेचा वीज पुरवठा बंद असलेला चालू करण्यास मदत, गावातील बोरवेलसाठी आर्थिक मदत, सन २०२० मध्ये सी. एम. फंडात आर्थिक मदत, २०२० मध्ये वाढता कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील प्रत्येक घरी एक लिटरचे हॅन्ड वॉश १०००, मास्क वाटप केले होते. 

या वर्षी पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने गावातील प्रत्येक घरी एक वाफ घेण्याची मशीन, व १०० एन-९५ मास्कचे मोफत वाटप केले. दोन वर्षात ग्रुपच्या वतीने दोन ते अडीच लाख रुपये खर्च करण्यात आला असून ग्रुप सदस्याकडून गाव कोरोना मुक्त व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


 हा उपक्रम राबवण्यासाठी सहदेव बोडके, रवी भुजबळ, बस्वराज भुजबळ, प्रवीण पाटील, काशिनाथ रड्डे, विश्वनाथ भुजबळ, सुप्रिया भुजबळ, लक्ष्मीबाई गिराम, गजेंद्र गाडेकर, नागनाथ गिराम, शिवरानी गिराम, राहुल भुजबळ, बालाजी बोडके,  ब्राह्मनंद बेळे, अतुल भुजबळ, कल्लेश्वर भुजबळ, सोनाली भुजबळ, महादेव ओवांडे, शकुंतला बचाटे, हनुमंत गिराम, महेश कदम, निकेश बचाटे, शिवराज शेटे, मंजुषा बादुले, शुभम भुजबळ, सचिन भुजबळ, वैजिनाथ भुजबळ, सिद्धालिंग बादुले, राहुल बादुले, सोमनाथ गिराम, विष्णू बेळे  आदींनी पुढाकार घेतला आहे.
 
Top