तुळजापूर, दि. ९ :
शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे क्रांती ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन यावेळी ५० दात्यानी रक्तदान केले.
सर्व नियमाचे पालन करून युवकानी दिवसभर रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी दाखवत युवकानी चांगले रक्तदान शिबिर संपन्न केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील कै. वसंत दत्तू वडणे यांच्या स्मृरणार्थ क्रांती ग्रुप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला तथागत गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य कुंभारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर कै. वसंत दत्तू वडणे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुहास वडणे यांनी केले. गावातील सामाजिक कार्यकर्ते रुबाब पठाण यांनी कै. वसंत दत्तू वडणे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
रक्तदान संकलनासाठी मेडिकेअर ब्लड बँक सोलापूर यांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य झाले. यावेळी 50 रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत या शिबिरात सहभाग नोंदला.
सर्व सहभागी रक्तदात्यांना मेडिकेअर ब्लड बँक सोलापूर यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आली. संपूर्ण शिबिरदारम्यान शिस्त व कोरोना बाबतचे शासनाचे सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजक क्रांती ग्रुप कुंभारी तसेच दिलपाक प्रतिष्ठानचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते