तुळजापूर, दि. ९: डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड ,तर मोठ्या झाडांचे अपरिमित नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या कुटुंबांना मदत करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी तुळजापूर शहर आणि परिसरात वीज कडाडण्याची अशा घटना घडल्या. त्याचबरोबर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस पडला. यामध्ये घरांचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे घरांची पत्रे उडवून भिंतींची पडझड झाली आहे.
शहरातील जिजामाता नगर, विश्वास नगर, हडको यासह तुळजाई नगर आणि सारा गौरव परिसर या भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याच्या घटना घडल्याचे दिसुन आले..
जुनी मोठ मोठे वृक्ष या वाऱ्याबरोबर उन्मळून पडले आहेत. महसूल प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाने पडझड झालेल्या कुटुंबांना मदत करण्याच्या अनुषंगाने पंचनामे करून तातडीची मदत देण्याची मागणी नागरिकांतुन होत आहे.