अणदूर ,दि.२६ : 
कोरोना कार्यकाळात आशा कार्यकर्तीचे काम खूप मोठे असून, त्यानी स्वतः कुटुंबाचा सुरक्षितपणे  सांभाळ  करत,रुग्णांची तपासणी करावी, आशा या खऱ्या अर्थाने कोरोना विरोधी लढाईत जमिनीवरील आद्य लढवय्या आहेत"असे गौरव उदगार उस्मानाबाद  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड यांनी काढले.


तुळजापूर तालुक्यातील   अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हॅलो मेडिकल फाउंडेशन संचलित आरोग्य स्वराज्य प्रकल्प अंतर्गत आशा कार्यकार्तीना कोरोना किट साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.


 कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे ,अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, हॅलोचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी, डॉ जितेंद्र कानडे आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना नियम पाळून झालेल्या कार्यक्रमात हॅलो तर्फे अणदूर आरोग्य केंद्राअंतर्गत असणाऱ्या 36 आशा कार्यकर्त्यांना कोरोना किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये पल्स ऑक्सिमिटर, थर्मल गन,4 मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्ड, श्यानिटायझर, औषधे, नोंदवही आदी साहित्य असून त्याचा वापर ते कोरोना प्रतिबंधासाठी करू शकणार आहेत.

सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक हॅलोचे अध्यक्ष डॉ शशिकांत अहंकारी यांनी  तर  सूत्रसंचालन बसवराज नरे यांनी केले. या वेळी आशा कार्यकर्ती इंदूबाई कबाडे यांनी हे साहित्य देऊन आशा चा सन्मान केल्याबद्दल हॅलोचे आभार मानले, 

कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ शेटे, डॉ अविनाश गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास पवार, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण, वर्षा पाटील, अनिता पापडे, राजेश्री नरवडे, पत्रकार उपस्थित होते
 
Top