जळकोट ,दि.२६ :
माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत  मौजे कुन्सावळी ता.तुळजापूर येथे  आरोग्य विभागाच्या टीमद्वारे ग्रामस्थांची कोरोना तपासणी (अँटीजेन टेस्ट) करण्याचे काम चालू केले आहे. गावातील नागरिकांना याआधीच मास्कचे वाटप करण्यात आलेले असून,गावात सॅनिटायझेशन देखील करण्यात आलेले आहे.दर तीन दिवसाला  ग्रामसेवक, अंगणवाडीताई, आशाताई,शिक्षक,गृहभेटी देऊन सर्वेक्षणाचे काम करत आहेत.



सदर नियोजन सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील,ग्रामपंचायत टीमच्या उपस्थितीत चालू आहे.   कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन केले जात असून नागरिकांना आवाहन केले जात आहे.
 
Top