नळदुर्ग , दि.२६ : एस.के.गायकवाड
अन्नदा संस्था मुंबई व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग शहरातील
विधवा, निराधार परित्यक्ता, एकल महिला व गरजू पावणे तीनशे कुटुंबाना मान्यवराच्या हास्ते अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागु करण्यात आलेल्या संचारबंदी, जनता कर्फ्यू,कडक निर्बंध यामुळे कामधंदा बंद पडल्याने आर्थिक आडचणीत सापडलेल्या नळदुर्ग येयील विधवा, निराधार, एकल महिला व गरजू गरिब अशा एकूण २७२ कुटूंबाना अन्नदा संस्था मुंबई व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि जगदिश राऊत ,पोउनि के.एम.लहाने , परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे ,यांच्या हस्ते अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक मधुकर लोखंडे , उमेश गायकवाड , प्रमोद लोंढे ,बशीर शेख इत्यांदि
उपस्थित होते