तुळजापूर,दि.०१ : 
जवाहर नवोदय विद्यालयात  शनिवार दि. १ मे  रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम विद्यालयाचे प्राचार्य,  के  वाय इंगळे व उपप्राचार्य  एस. वि स्वामी यांच्या हस्ते सकाळी ठीक ८:३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य  के. वाय.इंगळे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून महाराष्ट्र राज्याची कशी निर्मिती झाली? हे सांगून आजचा दिवस हा जागतिक कामगार दिन म्हणून का साजरा केला जातो ? याविषयी  विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, औद्योगिक क्रांतीनंतर लोकांना रोजगार मिळू लागला. परंतु त्याचा मोबदला अतिशय अल्प मिळत होता. तसेच कामगारांची पिळवणूक होत होती. बारा- तास, चौदा तास काम करावे लागत होते. यावेळी कामगार यांनी एकत्र येऊन संघटना निर्माण केली व या संघटनेद्वारे कामाचे तास, बालमजुरी, सुट्टीचे दिवस अशा अनेक मागण्या कशा पद्धतीने मान्य करून घेतल्या. 

 संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तशाच पद्धतीने  कोरोना मुक्त महाराष्ट्र असा संकल्प करूया आणि आपल्यावर असलेली जबाबदारी ती प्रामाणिकपणे पार पाडावी अशा प्रकारचे आवाहन प्राचार्य  के. वाय .इंगळे यांनी केले . राष्ट्रगीताने  कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे संयोजन श्री. एच जी.जाधव यांनी केले.

 
Top