जळकोट,दि.३० : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रहिवासी व नळदुर्ग येथील नॅशनल प्राथमिक मराठी शाळेचे सहशिक्षक भाऊराव मोरडे यांची कन्या कु. डॉ.अंकिता मोरडे हिने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातुन एमबीबीएस पदवी संपादन केल्याबद्दल जळकोट येथे मित्र परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कु.डॉ.अंकिता मोरडे हिचे प्राथमिक शिक्षण जळकोट तर महाविद्यालयाचे शिक्षण लातूर येथे झाले आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन केली आहे. जळकोट येथे मोरडे हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवृत्त मुख्याध्यापक हरिदास कदम,सौ. सुशीला कदम, गुंजोटीच्या श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रामकृष्ण कदम, सुप्रिया कदम ,श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार मेघराज किलजे, विमा प्रतिनिधी नितीन माळी, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक सुधीर कदम, चेतन सोनटक्के आदी उपस्थित होते.