तुळजापूर,दि.०१ :
पुण्यात स्थायिक झालेले किलज ता.तुळजापूर येथिल मुळ रहिवाशी संतोष दिगंबर शिंदे वय ४४ वर्ष यांचे पुणे येथे शुक्रवार दि.२९ एप्रिल रोजी कोरोनामुळे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई - वडील, पत्नी, दोन मुली, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
संतोष शिंदे यांना ञास होत असल्याने रात्रीच्या वेळी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. माञ उपचार सुरु असताना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्याचे निधन झाले.
त्यांच्या निधनाने वृत्त समजताच मिञपरिवार व किलज गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील भोसरी येथील स्मशानभूमीत दि.२९ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.