तुळजापूर,दि.७
जिल्ह्याचे पालकमंत्री शंकराव गडाख यांनी तुळजापूर येथील 124 कोविड सेंटरमध्ये चालू केलेल्या ऑक्सिजन लाईनचे शुक्रवार रोजी केले लोकार्पण
तुळजापूर येथे १२४ कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन बेडचे व्यवस्था केली असून याची पाहणी करून जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शुक्रवार दिनांक ७ रोजी सकाळी दहा वाजता याचा हस्ते लोकार्पण करण्यात आला.
यावेळेस खासदार ओमराजे निंबाळकर ,आमदार ज्ञानेश्वर चौगुले जिल्हाधिकारी कौस्तुभ दिघेगावकर ,तसेच नगराध्यक्ष सचिन रोचकरी ,जिल्हा वैद्यकीय अधिकारी धनंजय पाटील' तहसीलदार सौदागर तांदळे ,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे, जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी चंचला बोकडे आदी उपस्थित होते.
तुळजापूर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून जिल्हा उपरुग्णालयामध्ये ऑक्सीजन बेड कमी पडत असल्याने 124 कोविड सेंटर येथे 145 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली असून याचा लोकार्पण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख शुक्रवारी सकाळी दहा वाजता तुळजापूर येथे आले होते. प्रथम त्यानी 124 कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन पाईप यांची पाहणी केली. तसेच येथील रुग्ण बरोबर संवाद साधला.
त्यानंतर जिल्हा उपरुग्णालय येथे भेट देऊन तेथे चालू असलेल्या लसीकरणाची पाहणी केली.यावेळेस येथील डॉक्टर श्रीधर जाधव यांनी लसीकरणाबाबत माहिती देताना म्हणाले की, सध्या 200 लसीकरण होत आहे. सध्या पंचेचाळीस वर्षे पुढील व्यक्तिचे लसीकरण बंद आहे.
यावेळेस पालकमंत्री म्हणले की, लसची कमतरता कमी पडणार नाही. तरी आपण 45 वर्षा पुढील व्यक्तींना लसीकरण चालू करावे तसेच ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करू असेही यावेळी पालकमंत्री बोलताना म्हणाले.