तुळजापूर ,दि.७
तुळजापूर शहरात भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत उदूगडे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भ्रष्टाचार निर्मुलन समिती तुळजापूर शाखेच्या वतीने जिजामाता नगर, राजे संभाजी चौकात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी २५ वृक्ष लागवड करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुळजापूर तालुका उपाध्यक्ष दिनेश पलंगे यांचे सहकार्य लाभले. यावेळी भ्रष्टाचार निर्मुलन समिती तालुका अध्यक्ष विजय भोसले,तालुका संपर्क प्रमुख मंथन रांजणकर, तालुका सचिव दिनेश कापसे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.