तुळजापूर,दि.७ :
45 वर्षावरील शेकडो नागरीकांनी लसीकरण करुन घेतले, पहिला डोसचा कार्यकाल संपून गेला आहे, यामुळे दूसरा डोसच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकांना काळजी वाटत आहे, तरी आठवड्यातील एक किंवा दोन दिवस फक्त 45 वर्षा पुढील नागरीक व दूसरा डोस घेणाऱ्यांसाठी नियोजन तात्काळ करणे संदर्भात सुचना देण्याची मागणी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तुळजापुर शहराचे लसीकरण हे उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे सुरु आहे. परंतु येथे कोविडचा दवाखाना असल्याने लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांचा संपर्क कोविड रुग्णांशी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालय समोरील श्री वीरतपस्वी भक्त निवास ही जागा रुग्णालयच्या जवळ असल्याने डाँक्टरांना सोयीची आहे.
भक्त निवासचे मठाधिश श्री. डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज (सोलापुर) यांनी सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ बडुरे यांच्या मार्फत लसीकरणासाठी ही जागा विनामुल्य लागेल तितके दिवस उपलब्ध केली आहे, तरी वरील दोन्ही बाबींचा आपण गांभीर्यांने विचार करुन संबंधितांना तात्काळ सूचना द्याव्यात अशी विनंती निवेदनात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या उपस्थितीत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले यांनी दिले आहे.