कळंब,दि.१२
येथिल उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना वाफ घेण्याची मशिन्स, गरम पाण्याचे हिटर व उदबत्तीचे वितरण मान्यवराच्या हास्ते करण्यात आले.
निमित्त होते पत्रकार तथा नगरसेवक सतिश टोणगे यांची कन्या कु.सई हिच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुका पत्रकार संघाच्यावतीने आपली साई उपक्रमांतर्गत व दोस्ती ग्रुपच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना वाफ घेण्याची मशिन्स, गरम पाण्याचे हिटर व दोस्ती ग्रुप चे कैज येथील मित्र विकास आप्पा मीरगणे यांच्या वतीने रुग्णालयात आल्हाद दायक वातावरण तयार व्हावे यासाठी उदबत्ती बॉक्स वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवन वायदंडे यांच्या कडे देण्यात आले.
सईचा वाढ दिवस प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. यावेळी प्रा. संजय घुले, बाळकृष्ण भवर, रोटरी अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, रुग्ण कल्याण समितीचे हर्षद अंबुरे, भैय्यासाहेबा बावीकर, चेतन कात्रे, शिवप्रसाद बियाणी, उपस्थित होते.