तुळजापूर, दि. १२ :
जागतिक परिचारिका दिना निमित्ताने तुळजापूर शहरातील १२४ कोविड केअर सेंटर येथे परिचारिका दिन साजरा करण्यात आला.
परिचारिका कोरोनाच्या विरोधातील लढ्यात फ्रंटलाईनवर्कर आज जीवघेण्या कोरोनाच्या लढ्यात स्वतःच्या जीवाची वा कुटुंबाची कसलीही पर्वा न करता रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून लोकांची सेवा करत आहेत.
लोकांचे जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याच कार्याचा सन्मान मानून कोविड सेंटर मधील डॉक्टर, नर्स, व ब्रदर्स यांचा पुष्पगुच्छ आणि स्वीट देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सागर कदम किरण कदम परिश्रम घेतले.