तुळजापूर दि १२ :
 शासनाच्या प्रयत्नांनी व  नागरिकांच्या सतर्कतेमुळे  महाराष्ट्र राज्यामध्ये  संसर्गाची परिस्थिती सुधारत आहे.  सर्व नागरिकांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे  नियमांचे पालन करावे असे आवाहन  उपजिल्हा रुग्णालयात डॉ.चंचला बोडके यांनी केले .

तुळजापूर येथील नवनिर्मिती बहुउद्देशीय महिला मंडळ प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने १२ मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त तुळजापूर येथील  उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मीना सोमाजी यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळेस कासेगावकर सिस्टर, इंगळे सिस्टर, एस.भोसले सिस्टर, शीतल सिस्टर , धोत्रे सिस्टर, शिरसागर सिस्टर, मोरे सिस्टर, भालेराव सिस्टर,कुंभार सिस्टर, कुरुंदकर सिस्टर, खबोले सिस्टर, इत्यादी सिस्टर यांचा शाल व गुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी डॉक्टर चंचला बोडके यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या महत्त्वाच्या सूचना करून नागरिकांना सतर्क करीत आहे, या सूचनांचे सर्वांनी  पालन करणे गरजेचे आसल्याचे सांगितले . 

याप्रसंगी मीना सोमाजी बोलताना म्हणाल्या की, आज कोरोना महामारीने सर्वञ लोक त्रस्त आहे. अरोग्य कर्मचारी  जीवाची व संसाराची पर्वा न करता रुग्णाची सेवा करीत आहेत. आज यांचा गौरव करणे म्हणजे आमचे भाग्य आहे असे गौरवोद्गार काढले.

यावेळी संस्थेच्या सचिव रूपाली घाडगे ,अपर्णा बर्दापूरकर, लता सोमाजी व रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिका जिल्हा उप रुग्णालयच्या डॉ. श्रीधर जाधव इत्यादी उपस्थित होते.
 
Top