लोहारा ,दि.१२
तालुक्यातील माकणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या उदतपुर उपकेंद्रात दि.१२ मे रोजी पहिल्याच दिवशी ४५ वर्षापुढील १५६ नागरिकांना कोव्हीड-१९ लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी लसीकरण मोहिमेला उत्सर्फुत  प्रतिसाद दिला. 


या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. उदतपुरच्या सरपंच रंजना पवार, माजी सरपंच माधवराव पाटील, डॉ. विक्रम देशमुख, ग्रामसेवक आर.व्ही. आलमले, युवराज गायकवाड, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती क्रांती दलाल, स्वाती कुंभार, आदी उपस्थित होते.
 
Top