उस्मानाबाद ,दि. २२ :
कोवीड लसीकरणाच्या व्यवस्थापनेत सुधारणा करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यानी उस्मानाबाद जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, दि. १२ मे रोजी जेष्ठ नागरीक व ४५ वर्षापूढील सहव्याधी असलेल्या स्त्री , पुरुष यांना लसच्या दुस-या डोससाठी जवळपास दिड कलोमीटरची रांग लागलेली होती. सकाळी ५ वाजल्या पासून रांग लागलेली होती. सकाळी ७ वाजता आलेल्या व्यक्तीचा जवळपास २५० वा नंबर होता. याचा अर्थ ३०० व्यक्ती ह्या सकाळी ७.३० वाजताच आलेल्या होत्या. नंतर आलेल्या व्यक्तींना लस मिळणारच नव्हती, त्यांना योग्य मार्गदर्शन नव्हते, फक्त एक दिशादर्शक फलक लावून' त्यातुनही कांही योग्य मार्गदर्शन झाले नाही. कोव्हॅक्सीनचे फक्त ३०० च डोस उपलब्ध होते. याची जाणीव प्रशासनाला असताना सुध्दा हे प्रशासनाने जाहीर करणे गरजेचे होते.
ते न केल्यामुळे शेकडो लोकांनी लसीकरणासाठी गर्दी केली. याला जबाबदार कोण? आपल्याकडे पहीला डोस घेतलेल्या लोकांची पूर्ण माहिती आहे. पण प्रशासनाने कोणतेही पूर्व नियोजन केलेले नाही. याचा फटका नागरिकांना बसला आहे. कांही ठिकाणी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला.
शहरामध्ये प्रत्येक वार्डात शाळा आहेत याठिकाणी लसीकरणाचे नियोजन केले तर सर्वांना सोईचे होईल व गर्दीवर नियंत्रण राहील.
आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. सुजीतसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड लसीकरणाच्या व्यवस्थापनेत सुधारणा करणेबाबत जिल्हाधिकारी व शल्य चिकित्सक यांना पत्र देवून मागणी केली. यावळे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, सरचिटणीस देवकन्या गाढे, कुलदिपसिंह भोसले, स्वप्नील नाईकवाडी, विशाल पाटील, प्रसाद मुंडे उपस्थित होते.