तुळजापूर,दि.१९ : 
शहरातील अत्यंत गरीब व वयोवृध्द  हे उपाशी राहु नये याकरिता पुजा-यानी मोफत भोजनाची सोय केली. या प्रेणादायी उपक्रमाचे सर्वञ कौतुक करुन आभिनंदन केले जात आहे.


श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी विजय भोसले यांना श्री तुळजाभवानी देवीस आमची देवीस पूजा करा म्हणून देविभाविकानी पैसे पाठवले होते. त्यांनी ते  देवीस दुग्ध अभिषेक पूजा  घालून त्या भक्तांना रीतसर प्रसाद पाठवला. त्यांनंतर भाविकांनी पाठवलेल्या पैशात काही रक्कम उरली होती. ते त्यांनी त्याचे तुळजापुर शहरातील बस स्थानक,  मंदिर परिसरात, शहरातील झोपड्यात राहणारे अत्यंत गरीब गरजू व वृद्ध लोकांना अन्नदान केले.

 यावेळी धीरज जाधव दिनेश कापसे लखन शिंदें यांनीही यात हातभार लावला.
 
Top