तुळजापूर ,  दि. १९ : 
तुळजापूर तालुक्यात कोरोना रुग्ण व  त्यांच्यावर होणा-या उपचार पद्धतीच्या  अनुषंगाने  आरोग्य विभाग संचालिका डॉ अर्चना पाटील यांनी बुधवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालय आणि कॉल सेंटर यांना भेटी देऊन पाहणी केली.


महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ अर्चना पाटील यांच्यासमवेत  जिल्हा वैद्यकीय अधिकारी हनुमंत वडगावे, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडके,  वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीधर जाधव,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. आशिष लोकरे, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक' कोविंड विभागातील अधिकारी महादेव सोनार यांची उपस्थिती होती.

तुळजापूर येथील कोव्हीड विलगीकरण कक्ष येथे भेट देऊन  सुविधा आणि औषध उपचार यासंदर्भात  अर्चना पाटील यांनी आढावा घेतला. तेथे रुग्णांची विचारपूस करून त्यांनी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा यांची माहिती घेतली.


शहरांमध्ये संक्रमित व्यक्ती बाबत घेण्यात येणारी खबरदारी याची प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन त्यांनी माहिती घेतली. या अनुषंगाने केली जाणारी कार्यवाही याची माहिती नगरपरिषदेस विचारली. संसर्ग होऊ नये यासाठी नगरपरिषदेने कोणती खबरदारी घेतली आहे, याचा इतिवृत्तांत मुख्याधिकारी  लोकरे व कोरोना  विभागाचे महादेव सोनार यांनी  सांगितला.

नागरिकांमध्ये जनजागृती करणे , गर्दीवर नियंत्रण करणे,  विविध आवश्यक फवारण्या करणे, यासह शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना संसर्ग रोखण्याचे प्रयत्न नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत असल्याचे  सांगण्यात आले.
 
Top