तुळजापूर, दि. २८ : डॉ. सतीश महामुनी
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा सुशोभिकरण तातडीने सुरु करावे, महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा, व राणी लक्ष्मीबाई उद्यान येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुर्तीची रंगरंगोटी करावी, परिसर डागडुजी करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शिवबा राजे प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने दिले आहे
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना संबधितानी तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या बैठकीच्या अनुषंगाने या विषयाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन याप्रसंगी देण्यात आले आहे.
यावेळी शिवबाराजे प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष अर्जुनप्पा साळुंके ,विकास वाघमारे,नितीन जट्टे,ओंकार पवार उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हे शहराचे वैभव असून याचे सुशोभिकरण झाल्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडेल त्यामुळे प्रशासनाने तातडीने या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी शिवबा राजे प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष अर्जुनप्पा साळुंके यांनी केलेली आहे.