मुरूम, दि.२६  : 
दाळींब, ता. उमरगा येथील शेतकरी ग्यानप्पा शिरोळे व शेशिकला शिरोळे यांचा दानशूरपणा, मुलं जरी मोठ्या व्यसायात गुंतलेली असली, तरी मातीशी नाळ जोडून घरच्या शेतीत काबाडकष्ट करणारे जोडपे श्री.ग्यानप्पा व त्यांच्या पत्नी शेषीकला शिरोळे यांनी आजपर्यंत शेतामध्ये विविध पिकांचे प्रयोग करून उत्पादने घेतली आहेत. 

आपल्या कष्टातून  मिळविलेल्या उत्पन्नाचा आनंद वेगळाच असते, असे ते मानतात. विविध शेती उत्पादनातून मिळणार नफा हा वेगळा असतो, पण यंदाच्या भरगोस ज्वारीच्या उत्पन्नातून घरला लागेल एवढी ज्वारी ठेवून घ्यायची आणि उर्वरित ज्वारी विक्री न करता, आपल्या गावात चालू असलेल्या वृद्ध भोजन सेवा केंद्राला द्यायची ही संकल्पना उराशी बाळगून त्यांनी ती बुधवारी  रोजी पूर्ण केली. 


मुलांचे मोठे व्यवसाय असून देखील घरी बसून काय करायचे त्यापेक्षा दररोज शेतात दिवस निघाल्यापासून ते मावळतीपर्यंत स्वतः दोघेही शेतात राबून आलेल्या उत्पन्नातील १५ कट्टे ज्वारी बाबा जाफरी सोशल फाउंडेशन संचालित आधार भोजन सेवा केंद्राला पोहच केली. त्यांच्या या दानशूरतेबद्ल बाबा जाफरी फाउंडेशनमार्फत आभार मानण्यात आले.     
 
Top