तुळजापूर, दि.२६
शहरातील प्रभाग क्रमांक ०४ मधील मंकावती गल्लीतील पाणी टंचाई लक्षात घेता युवा नेते विनोद गंगणे यांनी स्वखर्चाने नवीन बोअर मंगळवारी घेतले. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी विनोद गंगणे, माजी उपनगराध्यक्ष सुहास साळुंखे, ज्येष्ठ नागरिक अशोक घाडगे, दिनकर व्यास, नेमचंद व्यास, बाळासाहेब व्यास, श्रीरंग निघते, गिरीश कुलकर्णी, आनंद बुरांडे, गिरीश देवळालकर, बापू नागेश, राजेश मलबा,गोपाळ खुरुद, ऋषिकेश साळुंके, परेश व्यास, हरी खुरुद, मुन्ना साळुंके आदीसह या भागातील नागरिक उपस्थित होते.
यावेळेस गंगणे म्हणाले की शहरातील अनेक भागात पाणीटंचाई असल्याने जास्त करून या भागात पाणी टंचाई होत असल्याने व एकही बोर नसल्याने मी स्वखर्चाने बोअर घेत आहे. यामुळे येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटेल.