काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कै. अब्रार साहेब काझी यांचे भाच्चे व प्रा.मुस्ताफा इनामदार व मुईज इनामदार यांचे सख्खे मावस भाऊ मुबीन नुरुद्दीन खतीब वय (71) रा.गुलबर्गा यांचे रविवार दि. (16) रोजी दुपारी अडीच वाजता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेत पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण झाले असून ते दहावीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. तसेच ते गुलबर्गा येथे शिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत राहून सेवानिवृत्त झाले होते.
त्यांच्या पार्थिवावर आज रविवार दि.16 रोजी संध्याकाळी 9 वाजता त्यांच्या मुळगावी चिडगुप्पा ता.हुमनाबाद जि.बिदर येथे दफनविधी करण्यात आला.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, पाच भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.