तुळजापूर दि.,०३ : 
श्री तुळजाभवानी मातेच्या नित्‍योपचार पूजेनंतर मस्तकी चंदनी मळवट भरून त्यावर आज डॉक्टरांचे चिन्ह असणारा लोगो आकर्षक हळदी कुंकवाचा काढून कोरोना महामारी या संकटातून सर्वांचे रक्षण कर म्हणून आज 03 मे रोजी धन्वंतरी महापूजा करण्यात आले आहे. 


जगावर सर्वत्र कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अनेक नियम व अटी लागू करून दिल्या आहेत, 

श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद असलेले तरी प्रशासनाच्यावतीने ऑनलाईन दर्शनची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर संस्थानच्या वतीने सर्व भाविकांनी ऑनलाईन दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे,आई श्री तुळजाभवानीचा मळवट भरून त्यावर कुंकवाने स्वस्तिक,कमळ, त्रिशूल, सूर्य,मोर, अशा प्रकारे धार्मिक चिन्हासह आकर्षक चिन्ह महंत आणि पुजारी रोज काढतात पण आज मात्र धन्वंतरी रूपात विशेष पूजा करण्यात आली होती देवीच्या मस्तकी कपाळावर डॉक्टरांचा लोगो असणारे बोधचिन्ह हळदी-कुंकवाचा काढण्यात आले.आणि देवीला डॉक्टर रूपात पूजा करून कोरोना पासून सर्वांचे रक्षण कर म्हणून प्रार्थना करण्यात आली.
 
Top