नळदुर्ग : एस.के.गायकवाड

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लागू केलेल्या संचार बंदी, जनता कर्फ्यू, लाँकडाउन यामुळे आर्थिक आडचणीत सापडलेल्या बुधवार पेट सोलापूर येथील गोरगरीब गरजू पन्नास कुटुंबाना   

 दि . 31 मे रोजी मायेची सावली बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने धान्य किटचे वाटप करण्यात आले.

    या वेळेस संस्थेचे प्रमुख डॉ. सतीश खारवे , रोहित खारवे  , डॉ. रितेश खारवे तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश सरवदे उपस्थित होते .

    डॉ. सतिश खारवे हे नळदुर्ग ता.तुळजापूर येथील मूळ रहिवासी असून मायेची सावली बहुउदेशियस विकास संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

 
Top