नळदुर्ग,  दि.९ :
अणदुर ता.तुळजापूर  येथे  महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त  शुक्रवार दि.१४ मे रोजी आयोजित रक्तदान शिबीरात  सामाजिक बांधिलकी म्हणून या जनसेवेच्या प्रकियेत सहभागी होण्याचे आवाहन सरपंच रामचंद्र आलुरे यानी केले आहे. 


सर्वञ  संसर्गजन्य कोरोनाच्या महामारीमुळे  रूग्णांना रक्ताची प्रचंड कमतरता भासत असल्याचे  ओळखुन हे शिबीर आयोजित  केले असुन रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे.  
 तुळजापूर  तालुक्यातील आणदुर शहरात जगतज्योती  महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त श्री निलकंठेश्वर मठात  रक्तदान शिबीर महात्मा बसवेश्वर महाराज जन्मोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. 


हे शिबीर  सकाळी ९ ते  सांयकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.तरी जास्तीत जास्त  युवक व नागरिकानी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top