उमरगा,दि.९: 
शहरातील बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर, ईदगाह कोविड सेंटर व माऊली कोविड सेंटर आदी विविध कोविड सेंटरला  आमदार ज्ञानराज चौगुले यानी भेटी देऊन रुग्णांची विचारपूस करून पाहणी केली.
 

त्यानी  सोयीसुविधांची माहिती घेतली. यावेळी  वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा देण्याच्या सूचनाही यावेळी आमदार चौगुले यानी केल्या. 

याप्रसंगी  सर्व कोविड सेन्टरमधील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तुरचे समन्वयक रमाकांत जोशी यांच्या सहकार्यातून रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्याकडून तज्ञ डॉकटरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असलेल्या औषधांचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर येथे युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, योगेश तपसाळे, शरद पवार, आदी, ईदगाह कोविड सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, खाजा मुजावर, जाहेद मुल्ला, आदी व माऊली कोविड सेंटर येथे उमाकांत माने, डॉ.विक्रम आळंगेकर, सिद्धेश्वर माने, विष्णू बिराजदार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top