जळकोट ,दि.९ : मेघराज किलजे तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथिल  चन्नबसव सामाजिक संस्थेच्या वतीने स्मशानभूमीत वास्तव्यास असलेल्या एका मनोरुग्णाची लाँकडाऊन काळात अन्न पाण्याची सोय केली आहे.


   अणदुर परिसरात भटकंती  करीत असलेल्या एका मनोरुग्णास अणदुर येथील चन्नबसव सामाजिक संस्थेच्या वतीने शिवशंकर तिरगुळे यांनी लाँकडाऊन काळात अन्न पाण्याची सोय करत आहेत.


 तो मनोरुग्ण लाँकडाऊन लागल्यापासून स्मशानभूमीतच वास्तव्यास आहे . अन्न पाणी मिळत नसल्याने त्या मनोरुग्णाचा जीव टांगणीला लागला होता .


अन्न व पाण्यासाठी तो मनोरुग्ण भटकंती करीत हॉटेल मालकाच्या दरवाज्यासमोर येताच कांही हाँटेल व्यवसायिकांनी त्यास अन्न व पाणी दिले जात होते . 
 कोरोनाचा  वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने लाँकडाऊन व संचार बंदी लागु केल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आपले हॉटेल बंद केल्यामुळे  मनोरुग्णास मिळत असलेला अन्न व पाणी बंद झाले.   

अशा अनेक मनोरुग्णांस अन्न व पाण्यामुळे तडफडून मरण्याची वेळ आली असताना या संस्थेने मनोरुग्णास अन्न व पाणी पुरवत  आहे. तरी शासन मनोरुग्णाची अन्न व पाण्याची सोय करेल का ?हे आता पाहावे लागणार आहे.

 
Top