तुळजापूर,दि.२४ :  
शहरातील एका  दुकानातुन 
बियाणे खते शेतक-यांना चढ्या दराने विकत असल्याची तक्रार उस्मानाबाद 
 जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे   भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष विजय भोसले यानी केली आहे.


 तुळजापूर शहरातील भवानी लॉज शेजारील रासायनिक खते बी बियाणे व औषधाचे विक्रेते कृष्णा एजन्सीज  हे शेतकऱ्यांना चढ्या दराने, बेभाव किमतीत खते व बियाणे विकत आहेत, 

तक्रारदार   विजय भोसले यानी डिएपी खत घेतले असुन त्याना चढया दराने खत विक्री केल्याची तक्रार आहे.


तरी संबंधित दुकानातील शेतकऱ्यांना विक्री केलेले खते ,बियाणे, शेतक-याना  दिलेले  बिले यांची तपासणी व चौकशी करुन दोषी आढळणा-या  सदरील दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

दरम्यान  कृष्णा एजन्सीजचे प्रतापसिंह सरडे यांच्याशी संपर्क साधला असता,खताच्या पोत्यावरील छापील किमंतीने खत विक्री केल्याचे सांगुन शासनाची कसलिही सुचना आम्हाला मिळाली नाही.

 
Top