किलज , दि.२४:
कोरोना संकटाच्या अनुषंगाने
गावपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ते रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी खबरदारीचे उपाय म्हणून नागरिकांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये किलज ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील व्यापारी वर्ग, आशा कार्यककर्त्या, जेष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली, यामध्ये ३ जणांचे अहवाल सकारात्मक आले असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी खबरदारीचा उपाय म्हणुन मार्गदर्शक सुचना देण्यात येत आहेत.
हि चाचणी करण्यासाठी ग्रामसेवक मातोळे, सरपंच अर्चना शिंदे, उपसरपंच दीक्षा गवळी, भरत गवळी, पोलीस पाटील सुनीता मर्डे, आशा कार्यकर्ती छाया गवळी, सारिका शिंदे, ग्रामपंचायत क्लर्क गोविंद शिंदे, प्रदीप शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.