उमरगा,दि.०३
उमरगा तालुक्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता नेहमीच सामजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असणारी माऊली प्रतिष्ठान उमरगा या संघटनेच्यावतीने आईसाहेब मंगलकार्यालयातील कोव्हिड सेंटरला उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हणमंत वडगावे यांनी भेट देवुन माहिती जाणुन घेतली.
आपत्कालीन काळात प्रतिष्ठान मार्फत चालु केलेल्या कोव्हिड सेंटरच्या संयोजकच कौतुक केले, तसेच महिलासाठी केलेल्या व्यवस्था आणि स्वयंपाक खोलीची पाहणी करून जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले तालुका वैदकिय अधिकारी, डॉ विक्रम आलंगेकर, आरोग्य अधिकारी डॉ डॉ सुहास साळुंके माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने, विजय जाधव, सिद्धेश्वर माने, डॉ नंदकिशोर पेठसांगवीकर , आकाश चव्हाण, राहुल सुरवसे, मितेश राखेलकर, विष्णु बिराजदार, सुमित घोटाळे, रोहित सूर्यवंशी , विष्णु पांगे, पिंटू मडोळे, स्वप्निल सोंनकवडे आदी उपस्थित होते .