उस्मानाबाद,दि.०३ : इकबाल मुल्ला

मुरुम ता. उमरगा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड व आयसीयु चालु करण्याची  मागणी जिल्हाधिकारी याना निवेदनाव्दारे भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिणियार यांनी केले आहे.


उस्मानाबाद जिल्हाधिकारी पाठविलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, मुरुम शहरात व परिसरातील २५ गावात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुरुम शहरातील ग्रामीण रुग्णालयाची अद्यावत बिल्डिंग आहे. सदरील बिल्डिंग मध्ये २५ ऑक्सिजन बेडची सुविधा आहे. ज्या कि कार्यरत नाही. ह्याची चौकशी केली असता मुरुम रुग्णालयात १० जम्बो ऑक्सीजन सिलेंडर होते. त्यापैकी ५ उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर व 2 उपजिल्हा रुग्णालय उमरगा या ठिकाणी देण्यात आले आहेत. 

सध्या मुरूम शहर व परिसरातील कोरोना  रुग्णांना उमरगा उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे ॲडमिट व्हावे लागते. तेथे बेड उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागत असून अनेक रुग्णाना आर्थिक परस्थिती अभावी उपचार घेऊ शकत नाहीत. तरी ग्रामीण रुग्णालय मुरूम येथे २५ ऑक्सिजन  बेडची सुविधा उपलब्ध करून द्यावी.  या ग्रामीण रुग्णालयात १ फिजिशियन डॉक्टर उपलब्ध करून द्यावे, ही सुविधा लवकरात लवकर करावी, जेणेकरून या भागातील सर्वसामान्य रुग्णांना उपचार करण्यास मदत होईल, अशी मागणी निवेदनात केली आहे.
 
Top