काटी , दि.१५ :
तुळजापूर तालुक्यातील तिर्थ (बु) गावचे लोकप्रिय सरपंच रमेश सुर्यभान माडजे वय (50) यांचे शनिवार दि. 15 रोजी पहाटे उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.
मागील दहा दिवसांपासून तुळजापूर व त्यानंतर उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शनिवारी पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.