तुळजापूर, दि. १५ :
तुळजापूर येथील महावितरण कर्मचारी सुरज कांबळे वय २२ वर्ष सेवेत कार्यरत असताना विजेचा झटका बसून जागीच मरण पावल्याची घटना अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात घडली आहे.
महावितरण मध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे सुरज कांबळे दररोजच्या प्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात लाईटचा पोलवर काम करत होते. मात्र यावेळी विजेचा धक्का बसून ते खाली कोसळले आणि जागीच ठार झाले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. कमी वयामध्ये अपघाती मृत्यू झाल्यामुळे तुळजापुरात हळहळ व्यक्त करण्यात आली.