काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे मंगळवार दि. (18) रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत   स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून आरोग्य विभाग व  प्रशासनाच्या सहकार्याने गावातील 45 वर्षापुढील दोनशे जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 

नागरिकांना  त्रास होऊ नये यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष, शिक्षक आणि आरोग्य सेवक,आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लसीकरण कक्षा बाहेर टेबल मांडून आधार कार्ड तपासणी, नागरिकांची नोंदणी करुन टोकन देण्यात येत होते. शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरणाची माहिती आणि महत्व व कोरोनाविषयी मार्गदर्शक सूचना समजावून सांगत कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे सांगण्यात येत होते. 

     या लसीकरण मोहिमेत डॉ. डी.पी. उपासे, सरपंच सौ.संगिता नागेश कोळी, उपसरपंच संतोष क्षिरसागर, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील विठ्ठल वडणे, सुहास वडणे, पंडित वडणे, विस्तार अधिकारी लोमटे, तलाठी रबडे, ग्रामसेवक मार्तंडे, कार्यकारी अभियंता सुरवसे, मुख्याध्यापक ए.डी.दुरुगकर, सहशिक्षक विजयकुमार गायकवाड, पोपट सुरवसे, श्रीमती व्ही.यु.गायकवाड, आरोग्य कर्मचारी श्रीमती शरसंभे मुलानी एस.पी. श्रीमती धनके ए.बी. बनसोडे बी.के. भोजने जी.पी. डाटा ऑपरेटर ज्ञानेश्वर दिलपाक , आशा कार्यकर्ती श्रीमती तांबे, अंगणवाडी कर्मचारी श्रीमती इंगळे, श्रीमती तांबे, श्रीमती नाईकवाडी, मिनाक्षी कानडे,श्री क्षिरसागर आदींनी परिश्रम घेतले.

 
Top