तुळजापूर, दि. ३ कुमार नाईकवाडी 

आरहान शेख या ८ वर्षाच्या चिमुकल्याने रमजान महिन्यातील पवित्र असा आपला पहिला रोजा अर्थात उपवास केला. त्याचे कौतुक होत आहे.
 

मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना दि. 14 एप्रिलपासून सुरू झाला आहे. या पवित्र रमजान मध्ये रोजा अर्थात उपवासास धार्मिक महत्व असून मुस्लीम बांधवाकडून रोजाची कडक धारणा केली जाते. पहाटे सहेरी केल्यानंतर दिवसभर काहीही न खाता व पाण्याचा एक थेंबही न पिता अल्लाहची आठवण करून रोजा पुर्ण केला जातो. 


या पवित्र रमजानच्या महिन्यात  30 दिवस अनेक जण अगदी धार्मिकतेने रोजा करतात. मुस्लीम धर्मामध्ये पाच तत्वापैकी रोजाला विशेष महत्व दिले जाते. 


कमान वेस, तुळजापूर येथील आरहान आलीम शेख या चिमुरडयाने रमजान महिन्यातील पवित्र असा आपला पहिला रोजा अर्थात उपवास सोमवार दि. 3 मे रोजी  पुर्ण केला. आरहान शेख हा नगरपरिषद शाळा क्रं. 3 तुळजापूर (खुर्द) येथे इयत्ता 3 री च्या वर्गात शिक्षण घेत आहे.
सध्या कडक उन्हाळा आहे, अशा कडक उन्हाळ्यात देखील लहान वयातच आरहान याने रोजा धरून तो पुर्ण केल्याने शेख परिवाराने त्याला पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या. तसेच नातेवाईकांनी त्याचे कौतुक केले.
 
Top