उस्मानाबाद, दि. १९
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी आल्याचे दोन दिवसापासून आलेल्या अहवालावरून दिसून येत आहे. मंगळवार दि. 18 मे रोजी जिल्ह्यात चारशे पॉझिटीव्ह रूग्ण आढळले, तर दिवसभरात 697 रूग्ण बरे होवून घरी गेल्याचे दिलासादायक बाब आहे. दरम्यान कोरोनाने 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
संसर्गजन्य कोरोनाच्या प्रादुर्भावाने दिवसेंदिवस वाढलेली बाधित रूग्णांची संख्या आता काही प्रमाणात कमी होत असल्याने जिल्ह्रयातील नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. मंगळवार रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यात नवे ४०० रुग्ण आढळले तर ११ जणांचा मृत्यू झाला. सोमवारच्या अहवालानुसार जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी झाली होती तर उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.
मात्र ग्रामीण भागातील रूग्णांचे प्रमाण अजूनही कायम आहे. मंगळवारी उस्मानाबादमध्ये १०२ रुग्ण आढळले. तुळजापूरमध्ये ८०, उमरगा ३०, लोहारा ३५,कळंब २८, वाशी ५७, भूम २५ व परंडा तालुक्यात ४३ रुग्ण आढळले आहेत.