मुरुम, दि.२३  : 
मदत नव्हे, हे माझे कर्तव्यच आहे. या जाणीवेतून नगरसेवक अजित चौधरी यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन, तुम्ही घाबरून जाऊ नका. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.  येणाऱ्या काळामध्ये अशी कितीही संकटे आली, तरी मी शहरातील गरजू नागरिकांना मदतच करेन, त्यांना काहीही कमी पडू देणार नाही. हे माझे कर्तव्यच असल्याचा आधार त्यांनी माता-भगिनींना यावेळी दिला.

  सर्वत्र कोरोना संसर्गामुळे हाहाकार माजला असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यातच सध्या लॉकडाउन लागू असल्याने ज्याचे हातावर पोट आहे. त्यांना विविध अडचणींना तोंड दयावे लागत आहे. 

यापैकी काही लोक जे उदरनिर्वादाच्या निमित्ताने पुणे, मुंबई व अन्य शहरामध्ये स्थायिक झाले होते. ते कोरोनामुळे गावाकडे आले आहेत. अजूनही कोरोना संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही. अशा संकटाच्या काळात गोर-गरीब, कष्टकरी कुटूंबियांवर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून अशा कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप रविवारी  दि.२३ रोजी युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. 



यावेळी जगदीश निंबरगे, शंकर इंगळे, माधवराव शिंदे, अरिफ कुरेशी, विशाल मोहिते, रवी अंबुसे, संजय आळंगे, जयसिंह खंडागळे, दत्ता चौधरी, प्रशांत चौधरी, अजित बिराजदार आदींनी पुढाकार घेतला.                                              
 
Top